
संतोष पंडितराव देशमुख बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मस्साजोग गावचे माजी सरपंच सगळ्या वयोगटातल्या माणसांची कनेक्ट असलेले आणि गावात अनेक विकासाचे काम केल्याने लोकप्रिय असलेले व्यक्ती सध्या मस्साजोगच्या सरपंच अश्विनी देशमुख या संतोष देशमुख यांच्या पत्नी त्यामुळे माजी सरपंच असले तरी त्यांचा गावाचे गावातल्या लोकांच्या कामाशी रोजचा संबंध पण याच मस्साजोग मधले लोक अहिल्यानगर अहमदपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत होती केज मध्ये लोकांनी बस सुद्धा पेटवून दिली. पण या सगळ्या मागे कारण काय होतं तर माजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून मग झालेली हत्या ०९ डिसेंबरला भर दुपारी देशमुख यांचा रस्त्यावरून अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर लोकांना सापडला त्यांचा रस्त्यावर पडलेला मृतदेह.फिल्मी स्टाईल अपहरण मग हत्या आणि आरोपींना अटक मस्साजोग मध्ये नेमकं काय घडलं पाहुयात..
सोमवारी दुपारी ३ वाजता संतोष देशमुख आपल्या गाडीमधून जात होते त्यांचा भाऊ शिवराज देशमुख हा त्यांची गाडी चालवत होता. देशमुख यांची गाडी डोणगाव फाट्याच्या पुढे आली.टोल नाकाच्या डाव्या बाजूच्या शेवटच्या लेण्यांमधून गाडी चालली होती ,सगळं काही सुरळीत आणि रोजच्या सारखाच होतं.पण तेवढ्यात एम एच ४४ झेड ९३३३ नंबर ची एक काळी स्कॉर्पिओ आडवी येऊन थांबली. हे गाडी आडवी थांबल्यामुळे देशमुखांच्या गाडीचा पुढे जायचा मार्ग अडकला, नेमकं काय झालं हे बघायला ते गाडीतून बाहेर पडणार इतक्यात या स्कॉर्पिओ मधून सहा जण खाली उतरले देशमुखांच्या गाडीच्या दिशेने चालत आले.त्यांच्यातल्या एका देशमुखांच्या गाडीच्या दरवाजाची काच एकाने दगडाने फोडली. तर दरवाजातून देशमुख यांना जबरदस्ती बाहेर काढलं.त्यानंतर त्यांना काठीने मारहाण केली आणि त्यांना ओढत ओढत स्कॉर्पिओ मध्ये बसवलं.
लागलीच ही स्कॉर्पिओ भरदाव वेगाने निघून गेली.सगळं घडल्यावर संतोष देशमुख यांच अपहरण झाल्याचे बातमी सगळ्या केज मध्ये वाऱ्यासारखी पसरली .पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात आली तपासाला सुरुवात झाली.दुसऱ्या बाजूला गावकरी सुद्धा देशमुखांच्या शोधासाठी बाहेर पडले. देशमुख कुठे असतील याचा तपास घेणं सुरू होतं,काही तासच उलटले असतील आणि बोरगाव दहिटणा रोडवर देशमुख यांचा मृतदेह सापडला. त्यांची हत्या करून मृतदेह रस्त्यावर टाकून हल्लेखोर पसार झाले होते.
संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा समजताच मस्साजोगमध्ये गावकऱ्यांची गर्दी वाढली.पोलिसांनी देशमुखांचा मृतदेह रुग्णालयात आणताच तिथे मोठ्या प्रमाणावर जमाव गोळा झाला. गावातच नाही तर सगळ्या तालुक्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.पण हे सगळं घडत असताना संतोष देशमुख यांचा भाऊ आणि अपहरण झालं तेव्हा गाडी चालवत असणाऱ्या शिवराज देशमुख यांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. जुन्या भांडणाचा राग डोक्यात धरून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा त्यांनी आपल्या फिर्यादीमध्ये लिहिलं. शिवराज देशमुख प्रत्यक्ष दर्शी असल्याने सुदर्शन घुले आणि त्याच्या पाच सहकाऱ्यांनी देशमुख यांचा अपहरण केल्याचे तक्रार त्यांनी दिली. -ह्या तक्रारीनुसार केज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १४० १२६ ११८ ३२४-४-५ १८९-२ १९१-२ आणि १९० अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला.पोलिसांनी अपर्णाची बातमी कळताच तपासाचे सूत्र हलवली होती. त्यात खुनाची घटना घडल्यानंतर पोलिसांनी आणखी फोर्स लावला.आरोपी कुठे जाऊ शकतात…याचा अंदाज घेत खबऱ्ऱ्यांच नेटवर्क ऍक्टिव्ह करत पोलिसांनी जाळं विणलं आणि आरोपी या जाळ्यात अडकले सुद्धा पक्क बसला नाही की पोलिसांनी बीड आणि धाराशिव जिल्ह्यात सगळ्या तपास यंत्रणांना ऍक्टिव्ह केलं होतं. मिळालेल्या माहितीच्या आधारावर वाशी पोलिसांनी आरोपींची स्कॉर्पिओ थांबण्यासाठी सापळा रचला होता.मांडवा मार्गे आरोपींची गाडी येईल अशी त्यांना टीप होती.पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आणि संध्याकाळी साडेसातच्या सुमारास एक काळी स्कॉर्पिओ पारा चौकात आली स्कॉर्पिओ चा नंबर होता एमएच ४४ झेड ९३३३. ज्या गाडीतून संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं, हीच गाडी पोलिसांच्या समोर होती. पोलिसांनी लागलीच ११२ क्रमांकाची जीप स्कॉर्पिओला आडवी लावली. पण स्कॉर्पिओ चालवणाऱ्या आरोपींनी जागेवर गाडी वळवली आणि बाजारपेठेत घातली. पोलिसांनी पाठलाग सुरू केला बाजारपेठेतल्या रस्ते अरुंद होते त्यामुळे स्कॉर्पिओ पार पुढे जाणार नाही याचा अंदाज आल्यानं या आरोपींनी गाडी तिथेच सोडली आणि अरुंद गल्लीबोळातून अंधारात पसार झाले.पोलिसांनी त्या स्कॉर्पिओ चा ताबा घेतला तेव्हा स्कॉर्पिओ मध्ये कोणीच नव्हतं पण रक्ताचे डाग मात्र आढळले.पोलिसांनी जप्त केलेली स्कॉर्पिओ सुदर्शन घुलेची असल्याने पोलिसांचा संशय पक्का झाला.
पण संतोष देशमुख यांची हत्या नेमकी का झाली…
तर मस्साजोग मध्ये अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाचे ऑफिस आहे.शुक्रवारी ६ डिसेंबरला ऑफिसमध्ये राडा झाला.टाकळीला राहणाऱ्या सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदार यांनी इथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यानंतर घुले आणि त्याच्या साथीदारांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल झाला.
पण या सगळ्या प्रकरणात पवनचक्की प्रकल्पाच्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांची बाजू घेतली आणि मध्यस्थी केली ती संतोष देशमुख यांनी.याच गोष्टीचा राग घुले आणि त्याच्या साथीदार यांच्या डोक्यात होता.त्यामुळे त्यांनी संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि त्यांना टोल नाक्याजवळून उचलत त्यांची हत्या करत रस्त्यावरच त्यांचा मृतदेह टाकून देण्यात आला.पोलिसांनी तपासाचे सूत्र वेगाने हलवली होती. देशमुख यांची हत्या करून आरोपी धाराशिव मध्ये वाशीच्या दिशेने गेले होते त्यामुळे पोलिसांनी आपला फोर्स वाशी भागात लावला.त्यांना मिळालेल्या टीपच्या जोरावर पोलिसांनी जयराम चाटे आणि महेश केदार या दोन आरोपींना ताब्यात घेतलं. सध्या त्यांची चौकशी करत पोलीस आणखी आरोपी बद्दलची माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतायत .पण संतोष देशमुख यांच्या हत्याचा कोडं सोडवण्यात पोलिसांना सध्या तरी यश आलय.
पण या हत्येमुळे केज मधलं वातावरण चांगलं तापलं.संतोष देशमुख यांनी आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात मस्साजोग मध्ये अनेक बदल केले होते.त्यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतला अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले होत. त्यामुळे त्यांची लोकप्रियता मोठी होती.हेच लक्षात घेऊन ग्रामस्थांनी मोठं आंदोलन उभं केलं.सुरुवातीला ग्रामस्थांनी, नातेवाईकांनी देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेणारच नाही अशी भूमिका घेतली होती.त्यानंतर जमावांन रस्ता रोको आंदोलन सुद्धा केलं.चिडलेल्या जमावांना टायर जाळले ,बस सुद्धा जळण्यात आली. या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं.आरोपींच्या पाठीमागे कोण आहे असा सवाल सुद्धा केला. तर मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांनी देशमुख यांच्या कुटुंबांची भेट घेत सांत्वन केलं आणि सीआयडी चौकशीच्या माध्यमातून आरोपींना शिक्षा करावी अशी मागणी सुद्धा केली. पण या प्रकरणामुळे फक्त केज किंवा मस्साजोग नाही तर सगळं बीड हादरलय, कारण एका माजी लोकप्रतिनिधीला भर रस्त्यातून भर दुपारी त्याच्याच गाडीतून बाहेर काढत त्याचं अपहरण केलं जातं आणि त्याच माजी लोकप्रतिनिधीचा मृतदेह बीडच्या रस्त्यावर सापडतो. निमित्त फक्त एका किरकोळ वादाचं आणि त्यातून डोक्यात भरलेल्या रागाचं होतं…